Tuesday, December 9, 2008

#######आशा##########

आशा
आशेच्या खळ्यात मीही वाहलो
पापण्यांवरची स्वने फुलवत राहिलो...
उशीराने कळले ..तो मळा होता बाभळीचा
मुळं खोल नव्हतीच ..तो लळा होता पालवीचा
हरलो होतो तोवर मी अन लाख जखमा कानांवर
सहन करता करता आली स्वप्नफुले गालांवर
सज्ज झालो लढाया मग हाती तुकडे हॄदयाचे
असण्या आणि नसण्यामध्ये अंतर पुन्हा नवीन खळ्याचे....
---संदीप उभळकर

3 comments:

Deepak said...

वा! आवडली कविता... छानच!

Sandeep Ubhalkar said...

thanks mitra

Amruta Bilgi said...

khhoooppp sudar kavita ahe...