जिवंत वर्णन :तो द्विधा मनस्थितीत आहे, रात्रभर तीचे स्वप्न पाहून सकाळी उठलेल्या त्याचे मनातील विचार जाणण्याचा हा प्रयत्न
"का येऊन माझ्यापुढे
पुन्हा सर्व सांडून गेलीस
साठवुन साठवुन लपवलेले
पुन्हा समोर मांडून गेलीस
रंगवलेली स्वप्न मनात
कशीतरी कोंबली होती
का येऊन माझ्यापुढे
सारी दारं उघडुन गेलीस"
"तुझ्याकडचे सारे शब्द
तेव्हा मी सोसले होते
मी जेव्हा बोलणार तेव्हा
समोर काहीच उरले नव्हते"
पाऊस आजही आला आहे
पाणी तसेच भरले आहे
तेव्हा कधी तू होतीस
आता माझा मीच आहे
पण,
आज तू पुन्हा मला
होती तशीच आठवून गेलीस
माझ्याच रागामध्ये मला
पुन्हा मला झुरवुन गेलीस
सारे काही अजून माझ्या
आठवणीत तसेच आहे
तूझे ते गोड हसणे
साठवणीत तसेच आहे
गालावरच्या खळीमध्ये
मीच घसरून पडलो होतो
चोरून मला तू पाहतांना
माझा मीच फसलो होतो
दारामध्ये आज मात्र मी
एकटाच उभा आहे
शब्दांच्या पुराचे पाणी
बाहेर काढून टाकत आहे
काही झाले तरी शेवटी
माझा मी तसाच आहे
शब्द, भावना आणि तु
यामध्येच झुलतो आहे
अजूनही मनात एक
आशा मात्र टिकून आहे
वाटेत कधी दिसशील म्हणून
दारात मी उभा आहे
दारात मी उभा आहे"
---संदीप उभळकर
2 comments:
My favourite poem among all the poem's..... Its too too too good.........
This is the one for which i will give ten on ten....
you have captured the thoughts of a lover in failed relationship really well..... Keep it up!
Post a Comment