रात्रीच्या त्या भयानक स्वप्नात
माझी स्वप्नेही घाबरली होती
स्वतःचेच पाण्यात बिंब पाहून
चित्ता घाबरतो ना कधीतरी तसे!!!!
काहीच कळत नाही काय होतयं ते...
प्रत्येक श्वासागणिक मनाची जशी
बावेतल्या कांडणाशी मारामारी होते..
आणि मग अचानक ते समोर येते
ज्यामुळे पापण्यांवरच्या रेषा बधीर होऊन जातात
सावळ्या गोंधळात मानेवरती चीर जाते
अगदी वाढदिवसाचा फुगा फोडावा तशी
आणि मग रडारडीच्या खेळातएक निखारा विझून जातो
...........अपेक्षांच्या वर्दळीत तेव्हा नकळत
....विरहाचा क्षण हरवून जातो
....आणि आपण उगा तेव्हा
....खोट्या अश्रुंचे सुतक पाळतो
---संदिप उभळ्कर
No comments:
Post a Comment