Saturday, September 15, 2007

चारोळ्या.........


------पहीली भेट-------(सत्यकथा)
म्हणू तशी पहीली भेट,आपल्याला मांडता येते
म्हटले तर दोन डोळ्यात,चांदरात साठवता येते
त्याच डोळ्यांच्या तिरकस नजरेचा,स्पर्श अजून आठवतो
थरथरणार्या आसमंतात त्या,थरथरणारा तुझा शब्द आठवतो
दोन क्षणांच्या गाठीभेटीतील,आसुसलेला तो रस्ता आठवतो
आणि काही क्षणांनंतरचा...
त्याच रस्त्यात आकंठ रक्तात बुडालेला,तडफडणारा तुझा तो जीवही आठवतो
---संदिप उभळ्कर
हवे तसे हवे त्याला
नाही कधी राहता येत
कितीही मनात आणले तरी
पानगळ नाही थांबवता येत
तू लाख ये म्हणशील
पण पाठी मी फिरू शकत नाही
भावनांच्या होळीमध्ये आज मी
रंगाना थांबवू शकत नाही
---संदिप उभळ्कर
**भास**
भास हे भासच असतात
ते कधी खरे नसतात
अर्थ जेव्हा उलगडत असतात
तेव्हाच तर राणी....
प्रेमात दोन जीव बुडत असतात
---संदिप उभळ्कर
"प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत
एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत
---संदिप उभळ्कर
असच काहीसं होत गं
माझ्याही मनात
पण अस्तित्वाला ते मान्य नव्हते
शहाण्यांच्या या जगात
---संदिप उभळ्कर
**अन्तर**
तुझ्या माझ्या मध्ये
फ़क्त इतकेच अन्तर आहे
टोके दोन असली तरी
धागा मात्र एक आहे ....
---संदिप उभळ्कर
मी तर पापण्या झाकल्या होत्या
मांजर दुध पित तसं
पण शब्दातच मी बुडत राहीलो
पुरात गुरं मरतात तसं
---संदिप उभळ्कर
शब्द,पूर आणि डोळे
सगळे शेवटी निमित्तच रे
मरण्याआधी आनंदासाठी कसे जगायचे?
याचेच निष्फळ प्रयत्न रे....
---संदिप उभळ्कर

No comments: