
तुझं मन मेलं गं..माझं कसं मारू???
जे नाहीच माझ्याकडे..त्याचा अंत कसा पाहू
चंद्र चांदणी अजूनी तिथेच,अन नयनातील अबोल श्वास
येशील पुन्हा बहर बनूनी,मनी मात्र एकच ध्यास..
काळीज तुझे ते त्या सरणावर..मी तरी मग कसा जगू?
गणित हेच उरात अजूनी ....
आपल्या उरल्या चंद्रांचे काय करू???
---संदीप उभळकर
No comments:
Post a Comment