Friday, December 14, 2007

....कोजागिरी....


........कोजागिरी..........

आकाशीच्या गोल शून्याचा
प्रकाश प्रखर परी तूझ्या नजरेचा
जणू जगू की जगवून मरू
ध्यास परी त्या हरेक किरणाचा
शोधित नजर त्या शून्य प्रेमाला
आयुष्याचे बळ सारे...फक्त त्या काही क्षणांना
आसमंत करी कोजागिरी साजरी.........
का कुणी त्यास त्याच पहाटे.......पाहीले का निस्तेज झुरतांना..........!!!!!!
पाहीले का निस्तेज झुरतांना..........!!!!!!!!!!!
---संदीप उभळकर

अळवावरच्या.........(My Another Fevo)


"अळवावरच्या पाण्यात मी
आताच न्हाऊन आलोय
आठवणींचा गाळ मी
आताच जाळून आलोय
खरचं,
शब्द हे मुके असतात
डोळे हे अधु असतात
तु असलीस नसलीस तरी
पापण्या मात्र रडत असतात
एकच गोष्ट आता मी
तुझ्याकडून शिकलो
जाळलेल्या आठवणींवर
जगायला शिकलो
मात्र आता खूप झाले
तुझ्यासाठी झुरणे
आसवांच्या नदीमध्ये
पुन्हा पुन्हा डुंबणे
ठरवलयं,
आता एकच गोष्ट करणार
समोर तुझ्या असाच जगणार
पाहू नको तेव्हा तू
माझ्या डोळ्यामध्ये
अधू ते नक्कीच असतील
"पाऊलखुणांमध्ये"

समोर कधी आलीस तरी
खंबीर उभा राहीन
चुकुनच जर बोललीस तर
हसून दाद देईन
"पण,"
यापुढे मात्र मला आठवू नकोस
स्वतःसाठी मला तू साठवू नकोस
कारण,
मीच नसेन तेव्हा
तुझ्या कश्यासाठीही
एकच फक्त असेल तेव्हा
"तुझ्या जीवामधूनी"
अळवावरच्या पाण्यात तेव्हा
तू न्हाऊन येशील
आठवणींचा गाळ तेव्हा
तू जाळून येशील."
---संदिप उभळ्कर

Wednesday, December 12, 2007

प्रेम.........प्रेम


परीक्षा देईल ते प्रेमच कसले
तडफडून मरेल ते प्रेमच कसले
वाट मग कसलीही असो
रस्त्यावरची नाहीतर तडफडण्याची
मजेवर जगेल ते प्रेमच कसले!!

प्रेम फक्त नाद आहे
अनुभवला तर साद आहे
दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे
आत असेल तर जगणं आहे
बाहेर गेला की प्राण आहे

---संदिप उभळ्कर

Sunday, December 9, 2007

My Fevo...4 Lines..

%%%सुकलेले पान %%%
मी मात्र तुझ्या जीवनात
एक सुकलेले पान आहे
शिशिराच्या भर पावसाततिथे
माझे म्हणणे शून्य आहे
-संदिप उभळ्कर


***हर्ष***
कळीचे फुलणे नि फुलपाखराचे येणे
टाचणी लावून जसे आभाळ ओतून घेणे
कसे बरे थांबतील मग हर्षाचे ते धुलीकण
पावसाच्या सरीमधले तुझे माझे मुके क्षण
-संदिप उभळ्कर


३३३३भावना३३३३
मुक्या भावनांना तेव्हा शब्दांची गरज नव्हती
मनातल्या समुद्राला थांगपत्त्याची गरज नव्हती
चांदण्यांच्या ओहोटीतही शब्दचंद्र अपूर्ण होता
निदान तेव्हा निमित्ताला कारणांची गरज नव्हती
-संदिप उभळ्कर


!!!!!अस्तित्व!!!!!
स्वप्नांच्या ताठा(टा)त माहीत नाही काय आहे
पहाटेला प्रखराचा निर्सगाचाच शाप आहे
संध्या जरी काळोखात बुडली तरी
खरयाखुरया अस्तित्वाला त्याचीच प्रबळ साथ आहे
-संदिप उभळ्कर

~~~शाप~~~
जगणे हा एक शाप आहे
मरण्याआधीचा व्याप आहे
भावनांच्या गुंतागुंतीत जिथे
पहिला आणि शेवटचा श्वास माफ आहे
-संदिप उभळ्कर

***निमित्त***

आयुष्याच्या सुरवातीलाच
मी आज निकामी ठरलो
साला बाम्ब(bomb)येऊन अंगणात पडला
आणि मी मात्र निमित्त ठरलो
---संदिप उभळ्कर

##ती##

ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले
---संदिप उभळ्कर


My Most Fevo
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी रुजणे
मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....
--संदिप उभळ्कर


()()()क्षुद्र()()()

आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती
....... आता त्याच्याच सोबती
--संदिप उभळ्कर

Thursday, December 6, 2007

वादळाच्या..................


"वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे

निळ्याशार पाण्यात मी
एकच बिंब पाहिले होते
वळून जेव्हा पाहिले तेव्हा
फक्त शब्दच उरले होते

याच किनारी बसून आपण
एक संध्याकाळ रंगवली होती
क्षितिजाला तेव्हा मी
हळूच हुलकावणी दिली होती

एकच साथ हवी होती
सोबत तुझ्या जगण्याची
हातामध्ये हात घेऊन
मॄगजळ पाहण्याची

किनारावर आजही मी
शांत उभा आहे
ओढून मला घेशील
याची वाट पाहत आहे

'आता माझे फक्त, एकच म्हणणे आहे
कधीही मला तू पुन्हा भेटू नकोस'

आता निदान थांबलो आहे
तेव्हा मी थांबणार नाही
माझे जीवन तेव्हा मी
माझ्या हाती ठेवणार नाही

म्हणूनच,
वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे"

continue...............

---संदीप उभळकर

Wednesday, December 5, 2007

बरंच काही..........(My Fevo)


बरंच काही निघून गेलयं
तरीही मी उभाच आहे
अर्थ सर्वच संपून गेलाय
तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली
मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा
हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तसं

तरीही,

बरंच काही शिल्लक आहे
अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत
फक्त माझ्यासाठी

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी
माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी
फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त
सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या क्षणीही
तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय


---संदीप उभळकर

माझा मी.............(पुन्हा तसाच)

प्रथमच मी या प्रकारची कविता सर्वापुढे आणत आहे,

जिवंत वर्णन :तो द्विधा मनस्थितीत आहे, रात्रभर तीचे स्वप्न पाहून सकाळी उठलेल्या त्याचे मनातील विचार जाणण्याचा हा प्रयत्न




"का येऊन माझ्यापुढे
पुन्हा सर्व सांडून गेलीस
साठवुन साठवुन लपवलेले
पुन्हा समोर मांडून गेलीस

रंगवलेली स्वप्न मनात
कशीतरी कोंबली होती
का येऊन माझ्यापुढे
सारी दारं उघडुन गेलीस"

"तुझ्याकडचे सारे शब्द
तेव्हा मी सोसले होते
मी जेव्हा बोलणार तेव्हा
समोर काहीच उरले नव्हते"


पाऊस आजही आला आहे
पाणी तसेच भरले आहे
तेव्हा कधी तू होतीस
आता माझा मीच आहे

पण,
आज तू पुन्हा मला
होती तशीच आठवून गेलीस
माझ्याच रागामध्ये मला
पुन्हा मला झुरवुन गेलीस


सारे काही अजून माझ्या
आठवणीत तसेच आहे
तूझे ते गोड हसणे
साठवणीत तसेच आहे


गालावरच्या खळीमध्ये
मीच घसरून पडलो होतो
चोरून मला तू पाहतांना
माझा मीच फसलो होतो

दारामध्ये आज मात्र मी
एकटाच उभा आहे
शब्दांच्या पुराचे पाणी
बाहेर काढून टाकत आहे

काही झाले तरी शेवटी
माझा मी तसाच आहे
शब्द, भावना आणि तु
यामध्येच झुलतो आहे


अजूनही मनात एक
आशा मात्र टिकून आहे
वाटेत कधी दिसशील म्हणून
दारात मी उभा आहे
दारात मी उभा आहे"

---संदीप उभळकर

***"नाते"***

***"नाते"***
मला कळलेले "नाते"मांडण्याचा प्रयत्न
नाते कसे असावे???
प्रश्न तर कठिण आहे....
पण जे कठिण आहे....
त्यालाच तर आपण आधी संपवतो
मग याचे असे का?
का ते लांबचे चंद्र सूर्य जवळचे वाटतात?
कधी चॊथ्या सीटवरचा म्हातारा जवळचा वाटला का...
तेव्हा'भावनांचे नात'नाही का आठवत..
अठराव्या वर्षी मत देतांना भ्रष्टाचाराचा राग आला होता...
पण पासपोर्ट काढतांना तो का गिळून र्निलज्य झालात..
तेव्हा अठरा वर्ष शिकलेलं'तात्विक नातं'नाही का आठवलं..
लहानपणी शाळेत केली होती झाडलोट मनापासून..
पण आता भर रस्त्यात थुंकतांना नाही का लाज वाटत
तेव्हा वर्गमित्रांसोबत घालवलेलं'स्वछतेचं नातं'नाही का आठवत...
म्हटलं तर सगळं सोप्प आहे अनुभवला तर स्वर्ग आहे...
म्हणूनच हल्ली मला नातंच पटत नाही..
आपल्याच घरी कोंबडी पाळूनतिचं मटण खाणं पटत नाही..
तरीही मित्रांनो,
प्रश्न मात्र तसाच राहतो
नाते कसे असावे???
नाते असावे प्रेतासारखे
वाटेत फुलं पसरत जाणारे...
नाते असावे फुलासारखे
तोडल्यावरही तीन दिवस आपल्याला हसवणारे...
आणि नाते असावे वाळवंटासारखे
दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे वागवणारे...
---संदिप उभळ्कर

Sunday, December 2, 2007

***विरहाचा क्षण***

***विरहाचा क्षण***

रात्रीच्या त्या भयानक स्वप्नात
माझी स्वप्नेही घाबरली होती
स्वतःचेच पाण्यात बिंब पाहून
चित्ता घाबरतो ना कधीतरी तसे!!!!
काहीच कळत नाही काय होतयं ते...
प्रत्येक श्वासागणिक मनाची जशी
बावेतल्या कांडणाशी मारामारी होते..
आणि मग अचानक ते समोर येते
ज्यामुळे पापण्यांवरच्या रेषा बधीर होऊन जातात
सावळ्या गोंधळात मानेवरती चीर जाते
अगदी वाढदिवसाचा फुगा फोडावा तशी
आणि मग रडारडीच्या खेळातएक निखारा विझून जातो
...........अपेक्षांच्या वर्दळीत तेव्हा नकळत
....विरहाचा क्षण हरवून जातो
....आणि आपण उगा तेव्हा
....खोट्या अश्रुंचे सुतक पाळतो
---संदिप उभळ्कर