Thursday, November 4, 2010

"स्व"

वेगळीच मजा असते,कुणाला आपलं म्हणण्यात
"स्व"पण विसरून त्याच्या "मी"पणात जगण्यात
पण माणसं हल्ली त्याचाच मुळी हक्क दाखवतात
अन त्या संभ्रमाला प्रेमाची व्याख्या देऊ लागतात..

---संदीप उभळकर
काही क्षणच उरले आता..ह्रदयातील हुंदक्यांचे..
जगबुडीची वेळ आली..पारीजातक सावर सखे..
पुन्हा हसावं पुन्हा रुसावं..वेळ उरली साठवणीतली..
चल मोडू रीत आज अन..
.....करू सावली एक आपुली..

...संदिप उभळकर

मी..

ग्रहणातला चंद्र मी ..मातीखालचा व्रणही मी..
मनस्वीकेच्या सावल्यातला अद्रुश्य असा सखा मीच..
घायाळ क्षणांच्या मोजदादित छळून उरला भास मी..
शिल्लक उरल्या श्वासांमधल्या तुझ्या आभाळी एकच पतंग..तोही मीच....

...संदिप उभळकर

*****न्याय*****


*****न्याय*****
नशीबाच्या हाती जेव्हा खेळणे होते गहाण
त्या दिशेच्या वारयालाही माहीत नव्हती तांबडी पहाट
काटयांच्यांही वाटयाचे तसे जीवन सुखीच होते
निवडुंगाला होती जेव्हा बाभळीची दुर्मिळ साथ
पाणी पाणी म्हणून जेव्हा डोह मुक्याने रडू लागला
त्या अश्रुंच्या खारट दवात बुडली होती स्तब्ध दुपार
"घागर होती त्या मातीचीच ज्यावर शिंपले अश्रु फाटके
फुटली निसटून अन विझली मग अंगणाची अक्षय तहान"
स्तब्ध तारे होते फक्त हसण्यातच जेव्हा दंग
आयुष्याच्या ग्रहणाचे ते करत बसले होते विचार
वाहून गेले बरेच काही मागल्याच पावसात
तरीही शेती कापसाची या मोहोराला माझ्या रानात
असतो जेव्हा प्रश्नातच खेळ जोडाक्षरांचा
उत्तरातही का कुणी मग न्याय शोधावा जीवाचा????
---संदिप उभळकर

***स्वप्नपावले***

***स्वप्नपावले***
धुळित होते तिथल्या अजूनी
आठवणींचे हताश किल्ले
पाणीच खारट किल्ल्यामधले
अन भरतीचे नुसते वणवे..
अशा ओळखी वाटेवरती,अनवाणी आयुष्य माझे
स्वप्नपावले संपली आता,रक्तठश्यांचे झेंडे अमुचे
---संदीप उभळकर

!!!!!!!!!!जमलेच नाही!!!!!!!!!!!!





आरशाला लपवणे जमलेच नाही
सावलीला थांबणे जमलेच नाही
नयनातील काळजाला आभाळी इंद्रधनू फुलोरा
राजालाही जंगलात त्याच्या चेकाळणॆ जमलेच नाही
मिठीत भळभळला जरी ढगफुटिचा पाऊस हिरवा
वसंतातला लाल सडा मग जमवणे जमलेच नाही
वणव्याचा अभिमानी मनोरा विश्वास आवळीत नाचला
काजव्यांचा स्वयंप्रकाश मला पाहणे जमलेच नाही
जगवले मी जन्मास माझ्या उधळून सारे डाव रडीचे
त्याच कलेच्या सोंगाड्याला तेव्हा जगणे जमलेच नाही
ते हसले अन माझ्यावरती अनेक फुले पसरून गेले
या धरेला त्या दुपारी मला साहणे जमलेच नाही
---संदिप उभळकर

Friday, December 26, 2008


मी तर तिच्या ठायी ठायी
होती तिजला जास्तच घाई
प्रेम बहुधा होते माझे..
पण तिची ती लगीनघाई
गरुडभरारी माझी होती
पण तिची सागरनिळाई
बुडून मेलो मी तर दोस्ता
ती तर चांदण्या हसत राही...
---संदीप उभळकर