Friday, December 26, 2008
Thursday, December 25, 2008
$$$$एक तुकडा$$$$

मनात अजूनही तुच आहेस
माझं जगणं जगलोय कधीच,उरलेली फक्त तुच आहेस
शब्द फसवे नव्हते गं,उत्तर होते ते "अपुले"
वादळ ते नव्हतेच गं,स्वप्नवारे होते "अपुले"
ज्या वळणावर सोडलंस मला,डोळे होते त्याच वाटेकडे
तुच निघून गेलीस कदाचित..पाठ होती ज्या हाकेकडे
तु चालत निघून गेलीस तुझे चंद्र गोळा करत...
नकळत तेव्हा तु गेलीस.."अपुल्या"चंद्रांचे भविष्य तुडवत
तुझं ह्रुदय रक्तबंबाळ झालयं माहीत आहे मला
माझ्या मनावरले घाव "ते" सोसतयं हेहि माहीत आहे मला..
तुला वाटतयं एक तुकडा अजूनही खुपतोय "जिथे"..
का गं तुला कळत नाही..
तो बोलतोय आजही तुला
मी वाट बघतोय अजूनही "तिथेच"...
------संदीप उभळकर
Wednesday, December 24, 2008
Tuesday, December 9, 2008
#######आशा##########
पापण्यांवरची स्वने फुलवत राहिलो...
उशीराने कळले ..तो मळा होता बाभळीचा
मुळं खोल नव्हतीच ..तो लळा होता पालवीचा
हरलो होतो तोवर मी अन लाख जखमा कानांवरसहन करता करता आली स्वप्नफुले गालांवर
सज्ज झालो लढाया मग हाती तुकडे हॄदयाचे
असण्या आणि नसण्यामध्ये अंतर पुन्हा नवीन खळ्याचे....
---संदीप उभळकर
Subscribe to:
Posts (Atom)