Thursday, November 4, 2010

*****न्याय*****


*****न्याय*****
नशीबाच्या हाती जेव्हा खेळणे होते गहाण
त्या दिशेच्या वारयालाही माहीत नव्हती तांबडी पहाट
काटयांच्यांही वाटयाचे तसे जीवन सुखीच होते
निवडुंगाला होती जेव्हा बाभळीची दुर्मिळ साथ
पाणी पाणी म्हणून जेव्हा डोह मुक्याने रडू लागला
त्या अश्रुंच्या खारट दवात बुडली होती स्तब्ध दुपार
"घागर होती त्या मातीचीच ज्यावर शिंपले अश्रु फाटके
फुटली निसटून अन विझली मग अंगणाची अक्षय तहान"
स्तब्ध तारे होते फक्त हसण्यातच जेव्हा दंग
आयुष्याच्या ग्रहणाचे ते करत बसले होते विचार
वाहून गेले बरेच काही मागल्याच पावसात
तरीही शेती कापसाची या मोहोराला माझ्या रानात
असतो जेव्हा प्रश्नातच खेळ जोडाक्षरांचा
उत्तरातही का कुणी मग न्याय शोधावा जीवाचा????
---संदिप उभळकर

No comments: