Monday, October 15, 2007

काही अजून........


**आठवण**

पानावरचे दवबिंदू
आजही तसेच आहेत
पाकिटावरून तुझे वाहणे
आजही तसेच आहे
उघडले त्याला आजही तरी
कातरवेळ प्रेमळ वाटते
सुकलेल्या थेंबाचे दवबिंदू
पिंपळपानात तसेच आहेत
---संदिप उभळ्कर


**सुख**

शब्द आता मित्र नाहीत
वाटेत आता काहीच नाही
तरीही मी हल्ली सुखात जगतो
काय झाले........
जरी मी क्षणाक्षणात शंभरवेळा मरतो..
--संदिप उभळ्कर

**आधार..........**
शब्दांचीच साद कानात होती,कधीकाळी
चंद्राचीच वाट डोळ्यात होती,कधीकाळी
जगबुडी तर कधीच झाली होती
पण शब्दांनीच माझी गळचेपी केली,कधीकाळी
आधार नक्की काय असतो
तेव्हा मला कळले
ह्रदयाचे ठोके जेव्हा कधी
शब्दांसाठी बंद पडले....

---संदिप उभळ्कर

***..नजर..***
थांबतील थांबतील काय म्हणतेस
मी तर सर्व जग थांबवले होते
अश्रुंचे सारे समूद्र मी तेव्हा
चार डोळ्यातून बरसवले होते
त्याच वाटेवर आज मात्र
पाऊलखुणाही दिसत नाही
धार काय नि काठी काय
जिथे आज वादळाला रडायला........
माझ्या नजरेत बघवत नाही ...
---संदिप उभळ्कर

मित्रा माझेही असेच काही झाले होते
संपवण्याचे सारे मार्ग खुले झाले होते
पण,
एकच हसू असे मिळाले की
स्वःतासाठी जगण्याचे सारे मार्ग बंद केले गेले
माझ्याच जीवनाच्या द्रुष्टिकोनात तेव्हा
विरघळण्याचे सारे मार्ग खुले झाले होते.........
---संदिप उभळ्कर


No comments: