Thursday, November 15, 2007

***मी नक्की कोण***

***मी नक्की कोण***



रात्रीच्या त्या अनोळखी प्रकाशवाटेवर
मीही स्वप्नांचा चुराडा केला
बरसणारया प्रत्येक स्पंदनांचा तेव्हा
काहीच जमले नाही तरी निदान अंकुर रुजवला

""दूर जेव्हा आपण एकटेच
स्वमध्ये स्वःताच नसतो
खरंच जर नीट पाहिले तर
आपण मरण्याच्या पण लायकीचे नसतो""
ज्या वाटेवर धावत सुटलो
अनवाणी खड्डे नि धोक्याची लक्तरे होती
पण बाजूच्याच वाटेवर नजर फिरवली तर तिथे
अस्तित्वालाच स्वपणाची क्लेषदायक लाज होती

सवंगडयांचाच खेळ सारा हा
जगण्याचा नि मरुन उरण्याचा
धरला त्याने तर जीवन संपले
सुटलाच तर मग मरण गोंजारण्याचा

का प्रत्येक सुत्र असेच असावे
हसतांनाही आत्म्याने रडावे...
"जगतोयच जर जगवण्यासाठी तर
का मग स्वतःचे तरी मुद्दे असावेत"????

---संदीप उभळकर

माझ्या चारोळ्या........



चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही

---संदिप उभळ्कर


थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले


---संदिप उभळकर


जीवनाच्या मॆफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले.........


---संदिप उभळ्कर


तुझ्याच त्या स्मितहास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते.....
साकारलेल्या त्या भावनांना
का आज शब्दच नाहीत??
का आज त्या डोळ्यांमध्ये
माझी एक ओळखही नाही


---संदिप उभळ्कर

Saturday, November 10, 2007

आज अचानक.......................


"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या क्षणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या क्षणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

---संदिप उभळ्कर

Wednesday, November 7, 2007

-----------*** भेट ***-----------------


आज माझ्या जीवनाला
एक नवा सुर मिळाला
रातराणीच्या फुलांना
आज नवा गंध मिळाला

तुझ्या आज असण्याने
मन माझे धुंद आहे
याच धुंदिचा आनंद
अंगणात मंद आहे

"शब्दांमध्ये व्यक्त करणे
मला निदान शक्य नाही
भावनांच्या गुंतागुंतीत
तुला शोधणे शक्य नाही"

वसंत होता श्वासही होता
पण तेव्हा तू नव्हता
फरक आता इतकाच आहे
माझ्या मनी तू आहेस

आता प्रत्येक पावसात मला
फक्त एकच गोष्ट हवी
कुशीत मला ओढून घेशील
साथ इतकी तुझी हवी

आता माझ्या प्रत्येक गोष्टीत
एका सुखाचा भास असतो
भासाच्या त्या प्रत्येक क्षणात
तुझ्या असण्याचा नाद असतो

एकच आता मला तुला
सांगावेसे वाटते

तुझ्या हरएक दुःखात तू
मला ओढून घे
काठावरतीच आहे अजून
हळूच मला कुशीत घे

continue.........

---संदीप उभळकर

Monday, November 5, 2007

****आयुष्याची पहाट******

एक व्यक्तिचित्रण रेखण्याचा प्रयत्न.......


अंधारातील प्रत्येक क्षणात मी
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
सकाळच्या दवथेंबामध्ये
गुलमोहोर मी साठवला
वारयाच्याही कानात मी तेव्हा
आत्मविश्वास जागवला
समोर दिसत नाही म्हणून मी
अश्रुनींही दिवे पेटवले
हात जेव्हा भाजले तेव्हा
त्यांनीच मला सावरले
उष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
सर्व ऋतु खेळून गेले
तीन पत्तीचा डाव
वादळही सांडून गेले
एक रडीचा डाव
उठतांना पंगतीतून पण
सारी आधी उठून गेली
डोळे उघडून बघण्याआधीच
वीज कडाडून निघून गेली
मुठीत ह्रदय आवळण्यात मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
अस्तित्वाच्या संघर्षातही
उणे काहीच नव्हते
अंधारातील प्रत्येक वणव्यात
हात मात्र हातात होते
क्षणाक्षणातील प्रत्येक युगात
साथ मला भरपूर होती
प्रत्येक एका अमवस्येला
चांदण्यांची बरसात होती
दोन मनांच्या भेटीगाठीत मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
तरीही असे का वाटते
हरवले असे का वाटते
कातरवेळी आज का
दवथेंबाचे वावगॆ वाटते
का आज नशीबाचे पाउल
मलाच थोडे उजवे वाटते
का आज दिव्यामध्ये
पतंग होऊन मरावेसे वाटते
याच उत्तरांच्या मूळ प्रश्नात मी आज
एक पहाट जागवत आहे
"होते" आणि "आहे" यामध्येच
गरुडझेप आठवत आहे

---संदीप उभळकर